सबनीसवाडा एकमुखी दत्त मंदिराचा २८ एप्रिलला वर्धापनदिन सोहळा

Edited by: विनायाक गांवस
Published on: April 27, 2026 12:47 PM
views 45  views

सावंतवाडी : सबनीसवाडा येथील एकमुखी दत्त मंदिर व वासुदेवानंद सरस्वती मंदिर येथे प्रतिवर्षाप्रमाणे वैशाख शु. १२ शके १९४८, मंगळवारी २८ एप्रिल २०२६ रोजी श्री टेंबेस्वामी पादुका मंदिरचा ११० वा वर्धापनदिन सोहळा साजरा करण्यात येणार आहे. या सोहळ्यासाठी श्री स्वामी भक्तांनी उपस्थित राहून स्वामी दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री दत्तमंदिर व वासुदेवानंद सरस्वती मंदिर देवस्थान स्थानिक उपसमितीच्या वतीने करण्यात आले आहे. यावेळी सकाळी ८.०० वा. श्री एकमुखी दत्त पूजा, लघुरुद्र, अभिषेक, ९.०० वा. श्री सत्यदत्त पूजा, दु. १२.३० श्रींची महाआरती, दु. १.३० वा. महाप्रसाद, सायं. ४.०० वाजल्यापासून तीर्थप्रसाद, सायं. ७.३० श्रींची आरती, ८.०० वा. श्रींचा पालखी सोहळा, ९.०० वा. स्थानिक भजन मंडळाचे सुश्राव्य भजन आदी कार्यक्रम होणार आहेत.