सोनुर्ली गावातून जाणारे भरधाव डंपर तात्ळाळ बंद करावेत

दुर्घटना घडल्यास महसूल विभाग जबाबदार : भरत गावकर
Edited by:
Published on: April 27, 2026 12:01 PM
views 51  views

सावंतवाडी : सोनुर्ली गावातून भरधाव वेगात क्रशर खाणीतील दगड घेऊन जाणारे डंपर महसुल विभागाकडून तात्ळाळ बंद करण्यात यावे. अन्यथा, कोणतीही जीवितहानी अथवा दुर्घटना घडल्यास त्यास महसूल विभाग जबाबदार राहील असा इशारा सोनुर्ली उपसरपंच भरत गावकर यांनी दिला आहे. वेत्ये सोनुर्ली भागात असलेल्या क्रशर खाणीतील दगड वाहतूक मोठ्या प्रमाणात सोनुर्ली गावातून होत आहे, एकापाठोपाठ एक डंपर या मार्गाने दगड वाहतूक करत आहेत. मुळात सोनुर्ली गावातून जाणारा हा रस्ता अरुंद असल्याने तसेच रस्त्यावरुन सतत ग्रामस्थांची व वाहनांची वर्दळ असल्याने या  डंपरचा धोका अधिक आहे. त्यामुळे  महसूल विभागाने या जो मार्ग या डंपरसाठी निश्चित केला आहे त्या मार्गाने ही वाहतूक व्हावी अशी अन्यथा कोणतीही जीशितहानी कींवा अपघातासारखी दुर्घटना घडल्यास त्यास सर्वस्वी जबाबदार महसूल विभाग राहील असा इशारा उपसरपंच श्री. गावकर यांनी दिला आहे.