
सावंतवाडी : निरवडे, कोनापाल जाधववाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य संदिप गावडे यांनी उपस्थित राहत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान विचारांचे स्मरण करून त्यांना अभिवादन केले.
डॉ. आंबेडकर यांनी दिलेला समानता, न्याय आणि बंधुतेचा संदेश आजही आपल्या समाजाला योग्य दिशा देणारा आहे. शिक्षण, स्वाभिमान आणि सामाजिक समतेच्या माध्यमातून त्यांनी उभा केलेला विचारसंपदा आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या विचारांवर चालत समाज अधिक सशक्त आणि समताधिष्ठित करण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे अशा भावना गावडे यांनी व्यक्त केल्या. यावेळी सावंतवाडी पंचायत समितीच्या सभापती सुस्मिता जाधव, उपसभापती गौरव मुळीक, निरवडे सरपंच सौ. गावडे, माजी सरपंच हरी वारंग, दादा गावडे, संतोष गावडे, रोहन मल्हार, आदेश जाधव, उपसरपंच अर्जुन पेडणेकर तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.











