
कणकवली : सावडाव : गावठाणवाडी येथील अशोक विठोबा वारंग (६१) यांना दांड्याने मारहाण केल्याबाबत मुलगा अभिषेक अशोक वारंग (३५, सावडाव - गावठणवाडी) याच्या विरोधात कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी रात्रीच्या सुमारास घडल्याचे अशोक यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
फिर्यादीनुसार अभिषेक याला दारू पिण्याचे व्यसन आहे. तो दारू पिऊन अशोक तसेच आपल्या आईला सातत्याने शिवीगाळ करीत असतो. शनिवारी रात्री देखील अभिषेक मद्यपान करून आला होता. त्याने सोबत चिकन आणले होते. ते शिजवण्यावरून त्याने आई-वडिलांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली याच वेळी त्याने परसातील दांडा आणून अशोक यांच्या डाव्या पायाच्या गुडघ्यानजीक मारहाण केली. तसेच आई व वडीलांकडे बघून 'तुम्हाला दोन दिवसात संपवतो' अशी धमकी देखील दिल्याचे फिर्यादित म्हटले आहे.











