
कणकवली : कलमठ - बिडयेवाडी येथील सौ. अंकिता प्रशांत रसाळ (३६) या १९ एप्रिलला सायंकाळी ४.३० वाजल्यापासून राहत्या घरातून बेपत्ता झाल्या आहेत. याबाबतची खबर त्यांचे पती प्रशांत जयंत रसाळ (३९, कलमठ - बिडयेवाडी) यांनी कणकवली पोलीस ठाण्यात दिली आहे. प्रशांत व अंकिता यांच्यामध्ये घरगुती कारणावरून काहीसे भांडण झाले. त्याच रागातून अंकिता घरातून निघून गेल्या, असे खबरीत म्हटले आहे. अंकिता यांचा रंग गोरा, उंची ५ फूट ४ इंच, बांधा मध्यम, चेहरा उभट, केस काळे व लांब, गळ्यात सोन्याचे लहान मंगळसूत्र,अंगात शेवाळी रंगाचा पंजाबी ड्रेस, हातात हिरव्या रंगाच्या बांगड्या आहेत. अशा वर्णनाची विवाहिता आढळल्यास संपर्क साधावा, असे आवाहन कणकवली पोलिसांनी केले आहे.











