
कणकवली : शिवडाव-तांबटवाडी-वाघोपेवाडी येथील शिवडाव साईनाथ सेवा मंडळाच्या श्री साईबाबा मंदिराचा ३५ वा वर्धापन दिन ३ व ४ मे रोजी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा केला आहे. रविवार ३ मे रोजी सकाळी ८.३० ते ११ यावेळेत आरोग्य शिबिर, दुपारी १२ वा. आरती, तीर्थप्रसाद, १ वा. महाप्रसाद, दुपारी ३.३० ते सायं. ७ यावेळेत साईंच्या पालखीची मिरवणूक, ७.३० वा. आरती, रात्री ८ वा. महाप्रसाद, १० वा. तांटबवाडी, वाघोपेवाडी भजनीबुवांचे चक्री भजनांचा कार्यक्रम होईल. सोमवार ४ रोजी पहाटे ५.३० वा. काकड आरती, सकाळी ८.३० वा. साई पादुका पूजन अभिषेक, ९.३० वा. श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी १ वा. महाप्रसाद, ३.३० वा. हरिपाठ, सायं. ४.३० वा. भजनांचा कार्यक्रम, ६ वा. आरती, ६.३० वा. सत्कार समारंभ, बक्षिसांची सोडत, रात्री ९ वा. महाप्रसाद, १० वा. श्री पार्सेकर दशावताश नाट्यमंळ, वेंगुर्ले यांचा प्रयोग होणार आहे. कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.











