प्रतिक बांदेकर यांची तत्परता

कॉलेज रोडवरचा खड्डा बुजवला
Edited by: विनायाक गांवस
Published on: April 26, 2026 13:03 PM
views 140  views

सावंतवाडी : शहरातील मोती तलाव कॉलेज रोडवर रस्ता खचून अचानक खड्डा पडला. जवळपास पाच फुट खोल हा खड्डा असल्याने अपघाताची शक्यता होती.‌ याची तात्काळ दखल घेत सभापती प्रतिक बांदेकर यांनी तो खड्डा बुजविण्यासाठी प्रशासनाला सांगितले. यानंतर लगेचच हा खड्डा बुजविण्यात आला. 

मोती तलाव कॉलेज रोडला रहदारीच्या ठिकाणी हा खड्डा पडला. या रस्त्याखालून मोरी गेली असून जवळपास पाच फुट हा खड्डा खोल होता. याची दखल घेत पाणी पुरवठा सभापती प्रतिक बांदेकर यांनी तात्काळ सुत्रे हलवली. बांधकाम अभियंता तुषार सरडे यांना घटनास्थळी बोलावून घेत पाहाणी केली. यानंतर तात्काळ तो खड्डा बुजविण्यासाठीचे काम सुरू करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते संजय नाईक यांच्या हा खड्डा निदर्शनास येताच त्यांनी तात्काळ तिथे दगड ठेवला. यामुळे अपघात टळले आहेत.