सावंतवाडी शहरात तब्बल २५ लाखांचे नुकसान

Edited by: विनायाक गांवस
Published on: April 24, 2026 15:48 PM
views 76  views

सावंतवाडी : शहारत काल झालेल्या वादळाच्या तडाख्यात अंदाजे तब्बल २५ लाख ९० हजार रूपयांचे नुकसान झाल्याची माहिती तहसीलदार श्रीधर पाटील यांनी दिली. रात्री झालेल्या वादळी वारा व पावसाने मोठी हानी झाली. सुदैवाने यात जीवीतहानी झाली नाही. 

शहरात जवळपास २५ ठिकाणी झाडे पडणे, महावितरण पोल वाकण्यासह ४ घरांवर झाड पडून नुकसान झाले. तसेच पत्र्याची शेड उडून गेल्याने मोठी हानी झाली. यात शहरातील ज्योती मुद्राळे यांचे अंदाजे १८ हजार, दीपक गावडे २२ हजार, प्रशांत गोसावी १९ हजार, चेतन गुप्ता २० हजार, स्नेहा सबनीस ५० हजार, वैभव सावंत यांची पत्र्याची शेड उडून गेल्याने ११ ला ७५ हाजर तर शेजारील श्री पंचम खेमराज महाविद्यालयाचे १२ लाख ६६ हजार तर गौरी परब यांचे २० हजार रूपयांचे मिळून अंदाजे २५ लाख ९० हजारांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती तहसीलदारांनी दिली आहे. त्यामुळे या वादळाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून मदतीच्या अपेक्षेत नागरिक आहेत.