लोरे नं. १ गावात बसवल्या सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशिन व सॅनिटरी नॅपकिन डिस्पॉजल मशिन

ग्रामपंचायतचा नाविन्यपूर्ण उपक्रम
Edited by: उमेश बुचडे
Published on: April 24, 2026 15:59 PM
views 14  views

कणकवली : लोरे ग्रामपंचायत नंबर एक गावामध्ये महिलांसाठी सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशिन व सॅनिटरी नॅपकिन डिस्पॉजल मशिन आल्या बसवण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान २०२५-२०२६ अंतर्गत सरपंच अजय रावराणे यांनी यांनी या उपक्रमाचा शुभारंभ केला आहे

लोरे नं.१ गावातील महिलांचे आरोग्य सुरक्षित राहावे आणि अत्यावश्यकवेळी महिलांना सॅनिटरी नॅपकिन सुलभरित्या उपलब्ध व्हावे यासाठी ग्रामपंचायत लोरे नं.१ येथील आरोग्य उपकेंद्र, लोरे नं.१ नरामवाडी शाळा व लोरे नं.१ हायस्कूल या ठिकाणी सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशिन व सॅनिटरी नॅपकिन डिस्पॉजल मशिन आस्थापित केले आहे. तसेच सॅनिटरी नॅपकीन ATM कार्ड तयार करून त्याद्वारे महिलांना मोफत सॅनिटरी नॅपकीन मिळेल अशी आधुनिक सुविधा उपलब्ध केली आहे. यावेळी उपस्थित महिलांना व ग्रामस्थांना  सरपंच अजय तुळशीदास रावराणे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले यावेळी अंगणवाडी सेविका सविता राणे यांनी उपस्थितांना सॅनिटरी नॅपकीन ATM कार्ड व डिस्पॉजल मशिनचे प्रात्यक्षिक करून दाखविले आणि माहिती दिली. उपस्थित महिलांनी या उपक्रमाबद्दल पंच व ग्रामपंचायत प्रशासनाचे कौतुक केले.