उषा परब यांच्या पुस्तकाचे २६ रोजी मुंबईत प्रकाशन

Edited by: विनायक गांवस
Published on: April 23, 2026 19:20 PM
views 13  views

सावंतवाडी : कोकण मराठी साहित्य परिषद, मुंबई जिल्हा तर्फे आयोजित सावंतवाडी येथील ज्येष्ठ कवयित्री, कादंबरीकार, नाटककार प्रा. उषा परब लिखित पुस्तकांचा प्रकाशन सोहळा येत्या २६ एप्रिल रोजी सायंकाळी ५.०० वाजता मुंबई येथे केशवराव घैसास ऑडिटोरियम, विलेपार्ले पू. मुंबई येथे होणार आहे. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या केंद्रीय सदस्य उषा परब यांच्या प्रकाशित होणाऱ्या 'स्त्रियांची ओवीगीतं आणि स्वरूप' या पुस्तकाचे प्रकाशन महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाने केले आहे. तसेच 'निसरड' हा कथासंग्रह डिंपल प्रकाशन, मुंबई यांनी प्रकाशित साज केला आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक, प्रमुख पाहुणे कोकण मराठी साहित्य परिषद केंद्रीय कार्याध्यक्ष तथा साहित्य आणि सांस्कृतिक मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. प्रा. प्रदीप ढवळ, कोमसाप केंद्रीय अध्यक्ष नमिता कीर तसेच ज्येष्ठ लेखिका मोनिका गजेंद्र गडकर, लेखक व समीक्षक डॉ. अजित मगदूम, अनुप कर्णिक, रेखा नार्वेकर, एल.बी.पाटील, दीपा ठाणेकर आदी उपस्थित राहणार आहेत. सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन लेखिका उषा परब, विद्या प्रभू व प्रशांत राऊत यांनी केले आहे.