व्ही पी कॉलेज माडखोलच्या विद्यार्थ्यांची गोव्यातील युनीकेम फार्मा कंपनीत निवड

Edited by: विनायक गांवस
Published on: April 23, 2026 18:21 PM
views 155  views

सावंतवाडी : व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी माडखोल, सावंतवाडी मार्फत दि. १८ एप्रिल २०२६ रोजी महाविद्यालयाच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल आणि युनिकेम लॅबोरेटोरीज लि. गोवा यांचा मार्फत कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्ह आयोजित करण्यात आला होता. महाविद्यालयाच्या इंडस्ट्रीयल जॉब साठी इच्छुक 46 विद्यार्थ्यांपैंकी एकूण 20 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. 

त्यापैकी प्रोडक्शन डिपार्टमेंट 9,क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंट 5,  क्वालिटी अशुरन्स डिपार्टमेंट 6 अशा एकूण 20 विद्यार्थांची या प्लेसमेंट ड्राइव्ह मध्ये निवड झाली.  कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्ह साठी समन्वयक म्हणून महाविद्यालयाच्या सह प्राध्यापिका सिद्धी खानोलकर, मेघा जाधव, वर्षा राणे आणि नीलम सावंत यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यापीठाच्या अंतिम परीक्षेपूर्वी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची फार्मास्युटिकल कंपनीसाठी निवड झाल्याने विद्यार्थी आणि पालक वर्गातून आनंद व्यक्त होत आहे. विद्यार्थ्यांना संस्थेचे प्रशासकीय अधिकारी पंकज पाटील, महाविद्यालयीन प्राचार्य डॉ सुनील शिंगाडे, प्लेसमेंट ऑफिसर डॉ संदेश सोमनाचे आणि विभाग प्रमुख आर्या तानावडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या विद्यार्थ्यांचे संस्थेचे आधारस्तंभ व प्रेरणास्थान माजी कुलगुरू डॉ वेदप्रकाश पाटील व संस्थेचे कार्याध्यक्ष आमदार डॉ राहुल पाटील यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.तसेच विद्यापीठ आणि मान्यता परिषदेच्या नियमित अभ्यासक्रमाबरोबरच महाविद्यालयात औद्योगिक व व्यावसाय पूरक अभ्यासक्रम घेतल्यामुळे  फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज साठी प्रशिक्षित आणि कार्यकुशल उमेदवार उपलब्ध होत आहेत. महाविद्यालयातर्फे  नजिकच्या काळात देखील विविध कंपन्याचे प्लेसमेंट ड्राइव्ह  आयोजित करण्यात येणार आहेत, असे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील शिंगाडे यांनी सांगितले.