रंजना कानसे यांनी प्रचाराचा केला शुभारंभ

माजगाव सरपंच पदाची निवडणूक
Edited by: विनायक गांवस
Published on: April 21, 2026 20:14 PM
views 17  views

सावंतवाडी : माजगावच्या महायुतीतील थेट सरपंच पदाच्या उमेदवार रंजना कानसे यांनी माजगाव येथील श्री महादेव आणि श्री सातेरी मंदिरात श्रीफळ (नारळ) ठेवून प्रचाराचा शानदार शुभारंभ केला. शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रेश्मा सावंत यांच्या उपस्थितीत प्रचाराचा नारळ फोडण्यात आला. यावेळी मंडळ अध्यक्ष मधू देसाई, भाजपा सरचिटणीस महेश धुरी, सरपंच रिची डिमेलो, अशोक दळवी, माजी सरपंच श्री. हरमलकर, आर. के. सावंत, संजय कानसे, सुरेश सावंत, तातू सावंत, विष्णू वेजरे, रामदास भोगण, विशाल लाड, श्री. रेडकर, संजय माजगावकर आदी महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते