
सावंतवाडी : चराठा टेंबवाडी येथील रस्त्यावर असलेल्या झाडाची जांभळ पडून झालेल्या अपघातांची तात्काळ दखल घेत चराठा सरपंच प्रचिती कुबल यांनी रस्ता वाहतुकीसाठी पूर्ववत करून घेतला. सार्वजनिक बांधकाम विभागच्या अखत्यारीत येणाऱ्या या रसत्याबाबत वेळोवेळी पाठपुरावा केला असून अधिकाऱ्यांकडून कार्यवाही होत नसल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, शेजारील घरातील पाणी रस्त्यावर येत असल्याने संबंधितांना देखील ग्रामपंचायतकडून समज दिली आहे. तसेच हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येत असल्याने गटारासह इतर बाबींसाठी संबंधित विभागाचे लक्ष वेधले होते. मात्र, अधिकाऱ्यांकडून तात्काळ कार्यवाही न झाल्याने नाराजी देखील सरपंच सौ. कुबल यांनी व्यक्त केली. दरम्यान, गाडी घसरून अपघात होत असल्याने ग्रामपंचायतीने तात्काळ साफसफाई करून घेत मार्ग मोकळा करून दिला. जांभळ पडल्याने हे अपघात घडले. आगामी पावसाच्या तोंडावर सार्वजनिक बांधकामच्या अखत्यारीत येणाऱ्या रस्त्यासह गटारांच्या दुरूस्तीबाबत ग्रामपंचायतीकडून लक्ष वेधण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.










