मोफत शिष्यवृत्ती सराव परीक्षेचं आयोजन

Edited by: विनायाक गांवस
Published on: April 18, 2026 13:34 PM
views 56  views

सावंतवाडी : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला चालना देण्यासाठी आणि स्पर्धा परीक्षेची पूर्वतयारी करून घेण्यासाठी शिक्षण प्रसारक मंडळ, सावंतवाडीचे अध्यक्ष विक्रांत सावंत यांच्या संकल्पनेतून इयत्ता चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी 'मोफत शिष्यवृत्ती सराव परीक्षेचे' आयोजन करण्यात आले आहे.

ही सराव परीक्षा मंगळवार २१ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १०:०० ते दुपारी १:०० या वेळेत पार पडणार आहे. दोडामार्ग इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज, दोडामार्ग येथे ही सराव परीक्षा होणार असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेचे स्वरूप समजावे, त्यांचा आत्मविश्वास वाढावा आणि प्रत्यक्ष परीक्षेपूर्वी त्यांचा सराव व्हावा, या उदात्त हेतूने विक्रांत सावंत यांनी या उपक्रमाचे आयोजन केले आहे. दोडामार्ग परिसरातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या मोफत संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.