
बांदा : भाजपा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी लोकसभा खासदार किरीट सोमय्या यांची बांदा मंडलात सदिच्छा भेट घेण्याचा योग आला. यावेळी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, भाजपा जिल्हा चिटणीस तथा पंचायत समिती सदस्य महेश धुरी, भाजपा जिल्हा कार्यकारिणी सदस्य उमेश पेडणेकर तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.
या भेटीदरम्यान भारतीय जनता पार्टीचे संघटन अधिक मजबूत करण्याबाबत, स्थानिक पातळीवरील विकासकामांना गती देण्याबाबत तसेच आगामी राजकीय घडामोडींविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी भारतीय जनता पार्टीच्या विचारांशी निष्ठा ठेवत “राष्ट्र प्रथम, पक्ष द्वितीय आणि स्वतः शेवटी” या तत्वावर कार्य करत जनतेच्या विकासासाठी सतत प्रयत्नशील राहण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.










