
दोडामार्ग : दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयाजवळ एक कार घळणीत जाऊन अपघात झाला. सुदैवाने चालक व त्याची पत्नी सुखरूप असून कारच्या दर्शनी भागाचे मात्र मोठे नुकसान झाले आहे. गुरुवारी दुपारी ३:४५ वा.च्या सुमारास ही दुर्घटना घडली.
एक इसम त्याच्या ताब्यातील मारुती सुझुकी अल्टो ८०० घेऊन गुरूवारी दुपारच्या सुमारास बांदाहून दोडामार्गच्या दिशेने येत होता. येथील ग्रामीण रुग्णालयाजवळ तो आला असता त्याचे कारवरील नियंत्रण सुटले व कार गणित कोसळून अपघात झाला. यावेळी चालकाचे डोके स्टेरिंगवर आदळले. मार्गस्थ होणारे वाहनचालक व स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. चालक व त्याच्या पत्नीला बाहेर काढले. सुदैवाने ते दोघेही सुखरूप होते. त्यानंतर दुसरे एक वाहन आणून त्याच्या साह्याने दोरीने कार बाहेर काढली. या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले आहे.










