खासदार डॉ‌. श्रीकांत शिंदे यांची संजू परब यांनी घेतली सदिच्छा भेट

Edited by: विनायाक गांवस
Published on: April 10, 2026 18:23 PM
views 79  views

सावंतवाडी : शिवसेना नेते, कल्याण - डोंबिवली लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ‌. श्रीकांत शिंदे यांची शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी भेट घेत शुभेच्छा दिल्या. माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त खासदार डॉ. श्रीकांत शिंदे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले असता शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी खास. शिंदे यांचे संजू परब यांनी शिवसेना पक्षाकडून स्वागत केले. खास. श्रीकांत शिंदे यांनी जिल्ह्यातील संघटनात्मक कामाची माहिती श्री. परब यांच्याकडून घेत त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.