कणकवलीत काही भागातील पाणी पुरवठा उद्या बंद

Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: April 10, 2026 19:58 PM
views 15  views

कणकवली : कणकवली शहरातील शिवशक्तीनगर येथील पाणीपुरवठा मुख्य जलवाहिनी लिकेज झाली आहे. परिणामी शनिवार, ११ एप्रिलला शहरातील शिवशक्तीनगर, जळकेवाडी , नगरपंचायत ऑफीस लाईन , हर्णे आळी, तेलीआळी,  बस स्टँड लाईन ,विद्यानगर, बांधकरवाडी, परबवाडी ,शिवाजीनगर, नाथ पै नगर, कनकनगर ,शिवशक्तीनगर , साईनगर, वरचीवाडी, या परिसरातील पाणीपुरवठा बंद राहील. नागरिकांनी याची नोंद घ्यावी व घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन नगरपंचायतीतर्फे करण्यात आले आहे.