
कणकवली : खासदार नारायण राणेंच्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री आशिष शेलार , भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे,आमदार प्रवीण दरेकर,आमदार प्रसाद लाड, हे कणकवलीत ओम गणेश निवासस्थानी दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत एकाच विमानातून ही मंडळी नेतेमंडळी चीपी विमानतळ येथे पोचली . मंत्री नितेश राणे यांनी त्यांचे विमानतळावर स्वागत केले व कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी ही सर्व नेते मंडळी पोचले आहेत. काही वेळातच नडवे नाका येथे आयोजित वाढदिवस 16 साठी हे मंडळी उपस्थित राहणार आहेत.









