वैश्यवाड्यात हनुमान जन्मोत्सवाला वारकरी दिंडीचा भव्य कार्यक्रम

Edited by: विनायक गांवस
Published on: March 31, 2026 18:03 PM
views 23  views

सावंतवाडी : वैश्यवाडा, सावंतवाडी येथील श्री हनुमान मंदिरात श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांबरोबर भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यात प्रामुख्याने 2 एप्रिल रोजी देवगड तालुक्यातील किंजवडे परबवाडी येथील श्री पावनाई देवी प्रासादिक मंडळाचा आगळा वेगळा वारकरी दिंडीचा कार्यक्रम होणार आहे.  दिनांक १ एप्रिल पासून हनुमान जन्मोत्सव निमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून यात 1 एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता महिलांसाठी पाककला स्पर्धा, 2 रोजी हनुमान जन्मोत्सव दिवशी सकाळी 8 वाजता सौ. ललीन तेली यांचे सुश्राव्य कीर्तन, श्री हनुमान जन्मोत्सव, दुपारी 3 वाजता श्री सत्यनारायण महापुजा, सायंकाळी तळवडे कुलदेवता प्रासादिक भजन  यांचे भजन, रात्री 9 वाजता किंजवडे देवगड येथील वारकरी दिंडी, या दिंडी मध्ये सुमारे 50 वारकरी सहभागी होणार असून विविध देवांची रुपे सादर केली जाणार आहेत. जिथं हरी भजनाचा रंग, तिथे नाचतो पांडुरंग ही या कार्यक्रमाची संकल्पना रहाणार आहे. 

तसेच श्री हनुमान जन्मोत्सवच्या दुसऱ्या दिवशी दिनांक 3 एप्रिल रोजी शुभम धुरी यांचा खेळ पैठणीचा कार्यक्रम व त्या बरोबर वैश्यवाड्यातील कलाकारांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. या सर्व कार्यक्रमाना उपस्थित रहावे, असे आवाहन श्री हनुमान मंदिर उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.