
बांदा : रविवारी संध्याकाळी ४ च्या सुमारास इन्सुली माडभाकरवाडी येथे इलेव्हन केवी विद्युत तारा तुटून शार्ट सर्किट मुळे शेतकरी गोविंद कृष्णा आमडोसकर गवताच्या गंजी जळून खाक झाल्या. यावेळी शेतकऱ्याला तुटपुंजी मदत देऊन महावितरणचे अधिकारी थातूर मातूर उत्तर देत होते. स्थानिकांनी जिल्हा परिषद सदस्य नितीन राऊळ यांना बोलावून याबबत माहिती दिली. यावेळी राऊळ यांनी आक्रमक भूमिका घेत जोपर्यंत संबंधित शेतकरी यांना नुकसान भरपाई देत नाही तोपर्यंत एकाही व्यक्तींनी विद्युत खांबावर चढू नये किंवा विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न करु नये असा सज्जड दम दिला.
वारंवार आपणास सांगूनही आपण दुर्लक्ष करता महावितरण कार्यकारी अभियंता वनमोरे यांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क केला असता तात्काळ भरपाई द्या असा इशारा दिल्यानंतर संबंधित शेतकरी यांना रोख रक्कम २५,०००/ रुपये नुकसानभरपाई देण्यात आली. \संध्याकाळी ठीक ०७:३० वाजेपर्यंत संपूर्ण पंचक्रोशीतील विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला. तसेच जे जीर्ण विद्युत खांब, विद्युत तारा, दुरुस्ती करा अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल असा इशाराही त्यांनी दिला.
यावेळी महावितरणचे कनिष्ठ अभियंता ठाकूर, इन्सुली क्षेत्रफळ पोलीस पाटील प्रिया कोठावळे, हेमंत नाईक, आप्पा आमडोसकर, कृष्णा कोठावळे, महेश धुरी, संदीप कोठावळे बांदा ग्रामपंचायत सदस्य राजाराम सावंत, जावेद खतीब, तसेच ज्ञानेश्वर सावंत, रामचंद्र कोठावळे, प्रशांत वारंग, सुजय कोठावळे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.










