
सावंतवाडी : सावंतवाडी शहरात खाऊ गल्ली व नरेंद्र डोंगर येथील योगा सेंटरसाठी माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातून निधी मंजूर झालेला होता. तत्कालीन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचही सहकार्य यासाठी लाभल होतं. त्यामुळे नगरपरिषदेतील सत्ताधाऱ्यांनी श्री. केसरकर यांचेही नाव घ्यावे अस मत विरोधी पक्षाचे गटनेते खेमराज उर्फ बाबू कुडतरकर यांनी व्यक्त केले.
मागच्या दोन दिवसांत खाऊ गल्ली व नरेंद्र डोंगर येथील योगा सेंटरसह विविध कामांबाबत सत्ताधाऱ्यांकडून विधान केल्यानंतर विरोधी पक्षाचे गटनेते श्री. कुडतरकर यांनी भाष्य केलं आहे. दीपक केसरकर यांच्या पाठपुराव्यामुळे शहराच्या विकासाला निधी मंजूर झाला असून ती काम आता मार्गी लागतील अशी माहिती त्यांनी दिली. सत्ताधाऱ्यांनी केलेल्या विधानांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपलं मत मांडलं आहे.











