वेंगुर्ले अणसूरपाल - सावंतवाडी बसमधून धुराचे लोट

Edited by: विनायाक गांवस
Published on: March 14, 2026 19:12 PM
views 26  views

सावंतवाडी : शहराच्या सीमेवर स्वागत कमानीलगत असलेल्या विशाल परब यांच्या कार्यालयासमोर वेंगुर्ले येथून सावंतवाडीच्या दिशेने येणाऱ्या वेंगुर्ले अणसूरपाल - सावंतवाडी या बसमधून अचानक धुराचे लोट वाहू लागले. सकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. यामुळे प्रवाशांत भितीच वातावरण निर्माण झाले होते.

बसमध्ये बसलेले विद्यार्थी आणि प्रवासी भीतीने बाहेर पडले‌. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या बस मध्ये 30 ते 40 प्रवासी प्रवास करीत होते. विद्यार्थी आणि प्रवाशांना धुरामुळे गुदमरल्यासारखे झाले. वाहक आणि चालकही बस बाहेर आले. नेमका धूर कशामुळे आला ? ते समजू  शकले नाही. मात्र, सावधानता बाळगत प्रवासी व वाहक चालक यांनी सुरक्षित ठिकाणाचा आसरा घेतला. यामुळे मोठी दुर्घटना देखील टळली.