
सावंतवाडी : शुद्धता आणि विश्वासाची प्रदीर्घ परंपरा लाभलेले जगविख्यात 'पु. ना. गाडगीळ (पीएनजी) ज्वेलर्स' आता सावंतवाडीकरांच्या सेवेत दाखल झाले आहे. सावंतवाडी येथील 'पंचमी हाईट्स'मध्ये या भव्य दालनाचे उद्घाटन माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते पार पडले.
या सुवर्णदालनाचे उद्घाटन श्री. केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आयसीआयसीआय बँक कुडाळचे ब्रॅन्च मॅनेजर महेंद्र सावंत उपस्थित होते. तसेच पीएनजी ज्वेलर्सचे डॉ. सौरभ गाडगीळ, पराग गाडगीळ, वृषाली संजय पिंगुळकर, श्रुती मंगेश हळदणकर आणि शंतनु संजय पिंगुळकर आदींची उपस्थिती होती. विविध कार्यक्रमांचे आयोजन देखील या निमित्ताने करण्यात आले आहे. गायक स्वप्नील गोडबोले व अक्षता सावंत यांचा म्युझिकल ज्वेलरी नाईट कार्यक्रम खास आकर्षण ठरला.










