
सावंतवाडी : रास्त धान्य दुकानात धान्य वितरणासाठी वापरलं जात ई-पॉस मशीन (e-POS Machine - Electronic Point of Sale) // रेशनकार्डवरील नाव ई-पॉस मशीनमध्ये दिसणाऱ्यांना मिळत धान्य // मात्र, या मशीनमध्ये नाव येण्यासाठी करावी लागते बरीच प्रतीक्षा // त्यामुळे अनेकजणांना रेशनकार्डवर नाव असून मिळत नाही धान्य // अगोदर ही प्रक्रिया व्हायची सावंतवाडीतील पुरवठा कार्यालयातून // मात्र, आता यासाठी पाठवल जात CSC सेंटरला // यासाठी CSC सेंटरकडून आकारलं जात २५० रुपये शुल्क // यासाठी CSC सेंटरकडून दिला जातो ६ महिन्यांचा कालावधी // एवढ असूनही ‘त्या’ CSC सेंटरमधील कर्मचाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर मिळत नसल्याचं अनेकांचं खासगीत म्हणणं // बऱ्याचदा उडवाउडवीची उत्तर दिली जात असल्याचंही जात बोललं // या प्रकाराकडे संबधित विभागाने लक्ष देण्याची मागणी // सर्वसामान्यांची कामे सुलभपणे होण्यासाठी करावा प्रयत्न //











