
कणकवली : नरडवे - टेमकरवाडी येथील श्रीमती मीना मोहन सावंत ( वय ७४ वर्ष)यांचे मंगळवार ३ मार्चला पहाटे निधन झाले. त्यांनी नरडवे ग्रामपंचायत सदस्य तसेच कणकवली पंचायत समिती सदस्य म्हणून काम केलेले होते. नरडवे येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात नरडवे ग्रामोद्धार संघाचे पदाधिकारी, ग्रामस्थ व माजी विद्यार्थी उपस्थित होते.
त्या नरडवे इंग्लिश स्कूलचे निवृत्त शिक्षक कै. मोहन सावंत यांच्या पत्नी, जांभवडे हायस्कूलचे शिक्षक उमेश सावंत , अभिषेक मेडिकल जोगेश्वरीचे योगेश सावंत आणि वकील सौ. प्रतिभा सावंत यांच्या आई होत.











