
सावंतवाडी : सावंतवाडी तालुका पंचायत समिती सभापती व उपसभापती निवड ९ मार्च रोजी होत असून भाजपकडून गट स्थापन करण्यात आला आहे. गटनेतेपदी बिनविरोध निवडून आलेले महेश धुरी यांची निवड करण्यात आली आहे. भाजपच्या पंचायत समिती सदस्यांकडून आज गट स्थापन करण्यात आला आहे. महेश धुरी यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. सभापतीपद आरक्षित असल्याने ते शिवसेनेच्या वाट्याला गेलं असून भाजपकडून उपसभापती पदी दावा केला जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आज गट स्थापन करण्यात आला असून यावेळी नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य प्राजक्ता केळुसकर, धनश्री मराठे, गौरव मुळीक, प्रशांत सुकी, नेहा कांबळी आदी उपस्थित होते.










