'I Am कॉमन पर्सन' ; विजय निश्चित !

शिवसेना उमेदवार ॲड. निता सावंत - कविटकरांचा विश्वास
Edited by: विनायक गांवस
Published on: November 16, 2025 14:31 PM
views 66  views

सावंतवाडी : ''आय एम कॉमन पर्सन'' आमच्या मागे लोक असून दीपक केसरकर यांनी केलेल्या विकासकामांच्या जोरावर आम्ही नक्कीच निवडून येऊ असा विश्वास शिवसेनेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार ॲड. निता सावंत-कविटकर यांनी व्यक्त केला. 

त्या म्हणाल्या, वकील म्हणून कार्यरत असले तरी महिला जिल्हाप्रमुख म्हणूनही मी काम करत आहे. जनतेचा विश्वास आमच्यावर आहे‌. विजय आमचा निश्चित आहे. महिलांसाठी, सामान्य जनतेसाठी मी काम करणार आहे‌. सामान्यांचे प्रश्न मला माहीत असल्याने मी स्वतः ते अनुभवल्यान निश्चितच त्यातून मार्ग काढेन असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.