चिमुकल्या नृत्याच्या प्रकृतीत सुधारणा

Edited by: विनायक गांवस
Published on: November 12, 2025 19:56 PM
views 15  views

सावंतवाडी : चिमुकल्या नृत्या जांभोरे हिच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाल्याची माहिती सामाजिक बांधिलकीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. त्यांनी कोल्हापूर हॉस्पिटलमध्ये जाऊन तिची व कुटुंबाची भेट घेतली. 

मागील एक महिन्यापासून कोल्हापूर येथील साई स्पर्श चाईल्ड हॉस्पिटल कोल्हापूरमध्ये एका दुर्गम आजारावर उपचार घेत असलेली चिमुकली नृत्या जांभोरे हिच्या प्रकृतीमध्ये आता हळू हळू सुधारणा होत आहे. गेल्या एका महिन्या पासून ती कोमा मध्ये होती परंतु सर्वांच्या कृपा आशीर्वादाने तिला ती आता शुद्धीत आली आहे आणि कालच रात्री तिला आयसीयू मधून बाहेर काढून जनरल ऑर्ड मध्ये ठेवण्यात आलेला आहे.

आजच सामाजिक बांधिलकीचे पदाधिकारी रवी जाधव, लक्ष्मण कदम, सुजय सावंत व प्राध्यापक सुभाष गोवेकर यांनी कोल्हापूर  हॉस्पिटलमध्ये मध्ये जाऊन नृत्याच्या  आई-वडिलांची भेट घेतील व नृत्याला बरी झालेली पाहून खूप आनंद झाला. दोन-चार दिवसात तीला डिस्चार्ज मिळेल असं डॉक्टरांनी सांगितलं.हे ऐकून सामाजिक बांधिलकीच्या पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. 

सामाजिक बांधणीच्या माध्यमातून नृत्याच्या उपचारासाठी जवळपास 50 हजार हून जास्ती रक्कम नृत्याच्या उपचारासाठी मिळून दिली होती. नृत्याच्या आई-वडिलांनी ब्रेकिंग मालवणीचे संपादक अमोल टेबकर, सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे सर्व सदस्य त्याचप्रमाणे इतर सर्व दात्यांचे आभार मानताना म्हणाले माझ्या मुलीचा जीव वाचवण्यासाठी आपण सर्वजण आमच्या देवासारखे पाठीशी उभे राहिलात त्यामुळे हे शक्य झालं आम्ही तुमचे उपकार कधीच विसरणार नाही आम्ही आपले मनःपूर्वक आभारी आहोत अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.