SPK च्या प्रदीप डिचोलकरला रनिंगमध्ये सुवर्णपदक

Edited by: विनायक गांवस
Published on: November 10, 2025 11:41 AM
views 98  views

सावंतवाडी : श्री पंचम खेमराज महाविद्यालय (स्वायत्त) चा विद्यार्थी प्रदीप शरद डिचोलकर याला मुंबई विद्यापीठ आंतर महाविद्यालयीन कोकण विभागीय मैदानी स्पर्धा दिनांक ३० ऑक्टोबर २०२५ ते २ नोव्हेंबर २०२५ रोजी एस वी जे सी टी सावर्डे येथे संपन्न झाली. या स्पर्धेत श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडीचा विद्यार्थी प्रदीप शरद  डिचोलकर ( तृतीय वर्ष कला) या विद्यार्थ्याने ४०० मीटर धावणे या क्रीडा प्रकारात सुवर्णपदक पटकाविले. 

त्याच्या या यशाबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष राजेसाहेब श्रीमंत खेमसावंत भोंसले यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संस्थेच्या चेअरमन राणीसाहेब सौ शुभदादेवी भोंसले, संस्थेचे कार्यकारी विश्वस्त युवराज लखराजे  भोंसले, संस्थेचे संचालक प्रा. डी टी देसाई, कार्यकारीणी सदस्य डॉ. सतीश सावंत, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी एल भारमल, महाविद्यालयाचे क्रीडा संचालक सीए नाईक, प्रा. एम ए ठाकूर व महाविद्यालयाचा  प्राध्यापक वर्ग उपस्थित होते.