
सावंतवाडी : ग्राहकांचं चार चाकी गाड्या घेण्याच स्वप्न पूर्ण करणाऱ्या 'शांतादुर्गा मोटर्स'च्या नव्या सुसज्ज दालनाचा शानदार शुभारंभ आज करण्यात आला. सुप्रसिद्ध डॉक्टर गोविंद जाधव व डॉ. सौ. स्वप्ना जाधव यांच्या हस्ते फीत कापून या दालनाचे उद्घाटन करण्यात आले.
पंचमी हाईटस, मोती तलाव जवळ, एसपीके महाविद्यालयाच्या शेजारील इमारतीत शांतादुर्गा मोटर्सच नवं दालन सुरू झालं आहे. ग्राहकांच चारचाकी घेण्याचं स्वप्न साकार करण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून हक्काचं दालन सुरू करत असल्याचे यावेळी विनायक शेटरक यांनी सांगितले. सर्व कंपन्यांच्या नवीन चारचाकी गाड्या व जुन्या गाड्या एक्सचेंजची सोय उपलब्ध आहे. जिल्हावासियांंना आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी हक्काचं ठिकाण यामुळे उपलब्ध झाले आहे. या उद्घाटनप्रसंगी शांतादुर्गा मोटर्सच्या सौ. पुजा शेटकर, विनायक शेटकर, बापू शेटकर, मंगला रेगे, रमा रेगे, पांडुरंग रेगे, उदय रेगे, सिमा रेगे, नारायण रेगे, सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र गावकर, राजन कुडतरकर, समिर वंजारी, साक्षी वंजारी, मनिषा रेगे, केयूर रेगे, भक्ती रेगे, उल्हास नाबर, लता नाबर, गिरीश नाबर, शांभवी नाबर, स्मिता राजाध्यक्ष, रोहन राजाध्यक्ष, पूर्वा राजाध्यक्ष, गोविंद माणगावकर, निता माणगावकर आदी उपस्थित होते. श्री. शेटकर यांच्या या दालनास भेट देत त्यांना अनेकांनी शुभेच्छा दिल्या.










