सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनची निवड चाचणी कबड्डी स्पर्धा

किशोर गटाचे अजिंक्यपद एस. एम. सिंधू स्पोर्ट्स वाडोसला
Edited by: विनायक गांवस
Published on: November 09, 2025 15:35 PM
views 31  views

सावंतवाडी : सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनची किशोर - किशोरी गट अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा नुकतीच सावंतवाडी येथे पार पडली. या स्पर्धेतील किशोर गटाचे अजिंक्यपद एस एम सिंधू स्पोर्ट्स वाडोस संघाने तर उपविजेतेपद दोडामार्ग पंचकोशी संघाने पटकावले. तर किशोरी गटात जय गणेश मालवण या संघाने विजेतेपद तर एस ए स्पोर्ट्स मालवण संघाने उपविजेतेपद मिळविले.

या संपूर्ण  स्पर्धेत किशोर / किशोरी गटाचे एकूण संघ २४ संघ सहभागी झाले होते .विजेत्या व उपविजेत्या संघाचे  तसेच सहभागी झालेल्या सर्व संघांचे अभिनंदन सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनच्या वतीने अध्यक्ष रुजारियो पिंटो  यांनी केले आहे .स्पर्धेचे उद्घाटन माजी नगरसेवक खेमराज उर्फ बाबू कुरतडकर ,शर्वरी धारगळकर,मुक्ताई अकॅडमीचे कौस्तुभ पेडणेकर,मुख्याध्यापक  भुरे सर,संस्था सेक्रेटरी डॉ . प्रसाद नार्वेकर,माजी नगरसेवक तथा फेडरेशनचे कार्याध्यक्ष संजय पेडणेकर,कार्यवाह दिनेश चव्हाण,उपाध्यक्ष तुषार साळगावकर,खजिनदार मार्टिन आल्मेडा,प्रशालेचे वैभव केंकरे,पंच तथा कबड्डी कार्यकर्ते श्री सुभाष धुरी,राजेश सिंगनाथ सर,राजन मयेकर,सिताराम रेडकर,क्रीडा शिक्षक तानाजी साळकर,राष्ट्रीय खेळाडू तथा निवड समिती सदस्य आलिस्का आल्मेडा व सुभाष धुरी आदी मान्यवर उपस्थित होते.

सर्व सामने अतितटीचे व रंगतदार ठरले.स्पर्धेतून किशोर गट व किशोरी गट असे संघ निवडले असून प्रत्येकी  14 खेळाडूंचा संघ पुणे येथे सुरू असलेल्या किशोर / किशोरी राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करीत आहे .निवडलेल्या दोन्ही संघांना राज्य स्पर्धेत सहभागी होण्यासाठी लागणारा संपूर्ण खर्च सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनच्या वतीने व आमदार दीपक केसरकर यांच्यामार्फत तर  दोन्ही संघांना लागणारा गणवेश माजी नगरसेवक खेमराज उर्फ बाबू कुडतडकर यांनी यांनी पुरस्कृत केला आहे. जिल्हा निवड चाचणी यशस्वी करण्यासाठी पंच म्हणून सहकार्यवाह नितीन हडकर,जयेश परब, प्रीतम बालावलकर, प्रशांत वारीक, राजेश सिंगनाथ,शैलेश नाईक,सिताराम रेडकर,वैभव कोंडस्कर,सुभाष धुरी,मिलिंद निकम,राजन मयेकर,हरिश्चंद्र साळुंखे,रोहित सावंत,आदींचे बहुमूल्य योगदान लाभले .

निवडलेला संघ किशोर गट -

अर्जुन चव्हाण,तुकाराम काळे,गौरव तांबोळे,राज परब,तेज कोयंडे,श्रेयस सावंत,रामचंद्र सरमळकर,साहिल चाळके,नहुश जाधव,रियान राऊत,गितेश नाईक,समर्थ राणे,मंथन जाधव,जतिन राऊळ,प्रशिक्षक-रोहित सावंत व्यवस्थापक जी. डी .सावंत

किशोरी गट निवडलेला संघ -

प्राची गावकर, प्रांजल हुले , किंजल अदम,निधी फाटक, साक्षी साळुंखे, इशा कोचरेकर ,लावण्य पेडणेकर ,रुचिका पालकर, श्रावणी लाड, तनिष्क वारीक,कुंजल गावकर, स्मितल पारधी, कनिष्का नाईक, प्रिया मसुरकर, संघ प्रशिक्षक आलिस्का आल्मेडा , व्यवस्थापक प्रणिता पारधी होते‌