
सावंतवाडी : कोकणची निसर्गसपन्नता, कोकणची संस्कृती, कोकणचे समाज जीवन, परंपरा आणि लोककलेचं दर्शन जगासमोर आणण्यासाठी भाजपाचे युवा नेते विशाल परब यांच्या संकल्पनेतून तसेच भारतीय जनता पार्टी सावंतवाडी यांच्या वतीने 'कोकण आपल्या नजरेतून' हि सिंधुदुर्गातील भव्य 'रिलोत्सव २०२५' स्पर्धा नुकतीच पार पडली.
प्रचंड सहभाग आणि उदंड प्रतिसादात अत्यंत चुरशीने पार पडलेल्या स्पर्धेत आकाश साळगावकर हा या भव्य स्पर्धेचा 'विजेता' ठरला त्याला भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या हस्ते प्रथम क्रमांकाचे २५००० हजार रूपयांचे बक्षीस व सन्मान चिन्ह देवून सन्मानित करण्यात आले. दर्शन भट 'उपविजेता' ठरला असून त्याला सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांच्या हस्ते द्वितीय क्रमांकाचे १५००० हजार रूपयांचे बक्षीस व सन्मानचिन्ह देवून सन्मानित करण्यात आले.
तृतीय क्रमांक रोहन सावंत याने पटकावला. भाजपाचे सावंतवाडी मंडल अध्यक्ष. सुधीर आडिवरेकर यांच्या हस्ते १०००० हजार रूपयांचे बक्षीस व सन्मान चिन्ह देण्यात आले.या बक्षिस वितरण प्रसंगी भाजपा चे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत,. ॲड. अनिल निरवडेकर, सौ. वेदीका परब, भाजपा महिला जिल्हाध्यक्ष सौ. श्वेता कोरगांवकर, माजी नगरसेवक . मनोज नाईक, राजू बेग, परिमल नाईक, आनंद नेवगी, सरचिटणीस दिलीप भालेकर, चिटणीस धिरेंद्र म्हापसेकर, दोडामार्ग भाजपा पदाधिकारी रंगनाथ गवस, सावंतवाडी महिला मंडल अध्यक्षा सौ. मोहिनी मडगांवकर, माजी नगरसेविका सौ. दिपाली भालेकर, सौ. समृद्धी विरनोडकर, महिला सरचिटणीस सौ. सुकन्या टोपले, सौ. मेघना साळगांवकर आदी उपस्थित होते.










