
सावंतवाडी : प्राणजीवन सहयोग संस्था शिरवल द्वारे संदीप चौकेकर यांच्या वाढदिवसानिमित्त २९ ऑक्टोबरला जिल्हास्तरीय जलद बुद्धिबळ स्पर्धेचं आयोजन करण्यात आलय. हि स्पर्धा सकाळी ९ पासून संध्याकाळी ७ वाजेपर्यंत सावंतवाडीतील कळसुलकर हायस्कूलच्या कार्यकम हॉलमध्ये होणार आहे. अंकित प्रभू आजगावकर, संदीप धुरी, चंद्रकांत रणशुर हे या स्पर्धेचे आयोजक असून नाव नोंदणीसाठी गितेश शेणई 8779150288, श्रीकांत तानावडे 9823230159, संदीप धुरी 9860682169 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आलय.