
सावंतवाडी : कारिवडे गावातील उबाठा सेनेचे बुथ अध्यक्ष विद्याधर उर्फ हनु परब यांच्यासह प्रमुख कार्कर्त्यांनी भारतीय जनता पार्टी जिल्हा सरचिटणीस महेश सारंग यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. प्रवेशावेळी भारतीय जनता पार्टी जिल्हा सरचिटणीस सारंग, कारिवडे गावचे सरपंच आरती माळकर, उपसरपंच तुकाराम आमुणेकर,भारतीय जनता पार्टी आंबोली मंडळ उपाध्यक्ष अशोक माळकर, माजी पं. स. सदस्या प्राजक्ता केळुसकर, ग्रा. प. सदस्य महेश गांवकर, तंटामुक्ती अध्यक्ष शंकर मेस्त्री, गावप्रमुख उमेश (बाळा) गांवकर,युवाप्रमुख अमर धोंड, प्रशांत राणे,बुथ अध्यक्ष १२६ चंद्रकांत साकुळकर, हनुमंत कारिवडेकर, भालचंद्र भारमल, नंदु लिंगवत, अनंत परब, विनायक साकुळकर, महादेव नाईक, नामदेव परब, बहुसंख्यक भारतीय जनता पार्टी कार्यकर्ते उपस्थित होते.