नरकासुर स्पर्धेत लक्ष्मीवाडी मित्र मंडळ प्रथम

आमदार निलेश राणे पुरस्कृत स्पर्धा
Edited by: निलेश ओरोसकर
Published on: October 20, 2025 18:02 PM
views 174  views

कुडाळ : आमदार निलेश राणे पुरस्कृत कुडाळ शहर शिवसेनेच्या वतीने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय नरकासुर वध स्पर्धेला उस्फुर्त असा प्रतिसाद लाभला या स्पर्धेच्या शुभारंभ असूनही आमदार निलेश राणे यांनी जिल्हावासियांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक लक्ष्मीवाडी मित्र मंडळ द्वितीय क्रमांक नेरूर येथील कलेश्वर मित्र मंडळ द्वितीय क्रमांक सावंत प्रभावळकर मित्र मंडळ यांनी मिळवला स्पर्धेमध्ये दोडामार्ग, वेंगुर्ला या भागामध्ये स्पर्धक सहभागी झाले होते.

आमदार निलेश राणे पुरस्कृत कुडाळ शहर शिवसेनेच्या वतीने पहिल्यांदाच नरकासुर ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती नकासुराचा वध हा श्रीकृष्णाने केला. हे दाखवणारी ही स्पर्धा होती या स्पर्धेमध्ये रथ,घोडे, श्रीकृष्ण दाखवण्यात आले होते आणि श्रीकृष्ण नरकासुराचा वध करतो अशी चलचित्रे स्पर्धेमध्ये सहभागी झाली होती स्पर्धेला जनतेतून उत्कृष्ट असा प्रतिसाद मिळाला सुमारे १७ स्पर्धक यामध्ये सहभागी झाले होते या स्पर्धेचा शुभारंभ आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत जिल्हाप्रमुख दत्ता सामाजिक यांच्या हस्ते झाला.

यावेळी माजी आमदार राजन तेली, उपनेते संजय आंग्रे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पडते, महिला जिल्हाप्रमुख दीपलक्ष्मी पडते, जिल्हा सरचिटणीस दादा साईल, उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर, ओंकार तेली, कुडाळ तालुका प्रमुख विनायक राणे, दीपक नारकर, मालवणचे राजा गावडे, कुडाळ शहर प्रमुख अभी गावडे, महिला शहर प्रमुख श्रुती वर्दम, नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर, गटनेता विलास कुडाळकर, नगरसेवक राजीव कुडाळकर, नगरसेविका नयना मांजरेकर, चांदणी कांबळी, तालुका सरचिटणीस राकेश कांदे, प्रवक्ता रत्नाकर जोशी, युवा शहरप्रमुख आबा धडाम, चेतन पडते, देवेंद्र नाईक, अनिकेत तेंडोलकर, रेवती राणे, राकेश नेमळेकर आधी उपस्थित होते.

स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक कुडाळ लक्ष्मीवाडी मित्र मंडळ, द्वितीय क्रमांक नेरुर कलेश्वर मित्र मंडळ, तृतीय क्रमांक कुडाळ सावंत प्रभावळकर मित्र मंडळ, उत्तेजनार्थ भैरव जोगेश्वरी मित्र मंडळ, बाजारपेठ मित्र मंडळ यांनी मिळवला. स्पर्धेतील सर्व सहभागी स्पर्धकांना सन्मानचिन्ह देण्यात आले. स्पर्धेचा प्रतिसाद पाहता कुडाळ शहर प्रमुख अभी गावडे यांनी पुढील वर्षी ही स्पर्धा ५५ हजार ५५५ असेल असे घोषित केले. स्पर्धेचे सूत्रसंचालन नागेश नेमळेकर यांनी केले.