वायरी - तारकर्ली - देवबाग रस्त्यावरील खड्डे काँग्रेसने बुजविले

बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याचा आरोप
Edited by: कृष्णा ढोलम
Published on: October 20, 2025 19:35 PM
views 53  views

मालवण : वायरी - तारकर्ली - देवबाग रस्त्यावरील खड्डे बुजविण्याबाबत बांधकाम विभागाला पत्र देऊनही त्यांनी दुर्लक्ष केले असा आरोप करत काँग्रेसने या मार्गांवरील खड्डे बुजविण्याचे काम पूर्ण केले. वायरी तारकर्ली मार्गांवर मोठ्या प्रमाणात खड्डे होते. सार्वजनिक बांधकाम विभाग मालवण यांस लेखी पत्र देऊन ही हे खड्डे व चर बुजावण्यात आले नसल्याने तसेच बुधवारी होणारा देव रामेश्वर पालखी सोहळा याच मार्गांवरून होणार असल्यामुळे युवक काँग्रेसचें माजी जिल्हाध्यक्ष तथा वायरी ग्रामपंचायतचे माजी सरपंच देवानंद लुडबे यांनी आज तात्काळ स्वखर्चाने खड्डे - चर बुजावण्यासं सुरवात केली.. 

यावेळी वायरी तसेच तारकर्ली - देवबाग येथील ये जा करणाऱ्या नागरिकांनी लुडबे यांचे खड्डे चर बुजावण्याचे कामं चालू असलेल्या ठिकाणी आभार मानले. यावेळी देवानंद लुडबे यांसोबत जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष मेघनाद धुरी, जिल्हा सरचिटणीस अरविंद मोंडकर, तालुकाध्यक्ष जेम्स फर्नांडिस, बाळू अंधारी, श्रीकृष्ण तळवडेकर, वायरी उपसरपंच प्राची माणगावकर, गणेश पाडगावकर, पराग माणगावकर, सरदार ताजर, दिलीप तळगावकर, मेघश्याम लुडबे व इतर पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते.