
सावंतवाडी : शहरात बाहेरचावाडा परिसरात घरात गोमांस असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानुसार घटनास्थळी धडक दिली असता घरात गोमांस आढळून आले आहे. पोलिसांकडून पंचनामा सुरु असून कारवाई केली जात आहे. थोड्याच वेळात संबंधिताला पोलिस ठाण्यात घेऊन जाणार आहेत. पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्यासह पोलिसांची मोठी फौज बाहेरचावाडा येथे उपस्थित आहे. यानंतर गोरक्षक, बजरंग दल व विहींपने तीव्र संताप व्यक्त केला आहे. पोलिस लाठीवरून गोमांस पुढे येतच कसं असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.