
सावंतवाडी : दोन्ही किडन्या निकामी झाल्यामुळे दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या झोळंबे येथील ३२ वर्षीय तरुण सुनेश उदय गवस यांच्या मदतीसाठी मदतीचा हात पुढे करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सुनेशला नवसंजीवनी देण्यासाठी त्याच्या आईने आपली किडनी दान करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, किडनी प्रत्यारोपणासाठी लागणाऱ्या १२ ते १४ लाख रुपयांच्या खर्चाची व्यवस्था करणे त्यांच्यासाठी अशक्य आहे.
सुनेशच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. त्याचे वडील अकाली गेले असून कुटुंबात पत्नी, तीन वर्षांची मुलगी आणि आई यांचा समावेश आहे. गोवा येथे टॉवरचे ॲन्टिना बनवणाऱ्या कंपनीत काम करून सुनेश कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. पण, आता उपचारासाठी त्याला काम सोडावे लागले आहे. गेल्या पाच महिन्यांपासून त्याला अशक्तपणा जाणवत होता. तपासणी केल्यानंतर त्याच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याचे निदान झाले. हे ऐकून त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. सध्या तो डायलिसिसवर असून आपल्या मुलाचा जीव वाचवण्यासाठी आई उर्मिला यांनी आपली किडनी देण्याची तयारी दर्शवली आहे. पण, उपचाराच्या मोठ्या खर्चाने त्यांच्यासमोर मोठा प्रश्न उभा राहिला आहे. आजवर उपचारासाठी कुटुंबाने सर्व जमापुंजी खर्च केली आहे. या गंभीर परिस्थितीत सुनेशच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू फुलवण्यासाठी आणि त्याच्या कुटुंबाला आधार देण्यासाठी समाजातील दानशूर व्यक्ती आणि सेवाभावी संस्थांनी आर्थिक मदत करण्याचे आवाहन जुळंबे क्रिकेट प्रीमियर लीगने केले आहे.
*मदत पाठवण्यासाठी तपशील*
*बँक खाते*
नाव: सुनेश उदय गवस
बँक: बँक ऑफ इंडिया, बांदा शाखा
खाते क्रमांक: १४६५१०५१००००६६३
IFSC कोड: BKID0001410
गुगल पे/UPI:
गुगल पे नंबर: ९४०५१५२२७५
UPI आयडी: suneshgawas1953@okicici अधिक माहितीसाठी, रवींद्र गवस यांच्या ९४२०९५०७३३ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधू शकता.