विज्ञान नाट्योत्सव स्पर्धेत मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलचे उल्लेखनीय यश

Edited by: विनायक गांवस
Published on: September 15, 2025 17:38 PM
views 80  views

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळ आयोजित 'तालुकास्तरीय राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव 2025' मध्ये सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मदर क्वीन्स  इंग्लिश स्कूल सावंतवाडीच्या नाट्यसंघाने तृतीय क्रमांक पटकावत उत्तुंग यश संपादित केले. या स्पर्धेसाठी सावंतवाडी तालुक्यातील एकूण 10  संघ सहभागी झाले होते. 

मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलच्या नाट्यसंघाने मानव कल्याणासाठी विज्ञान व तंत्रज्ञान   यातील उपविषय सर्वांसाठी स्वच्छता या विषयांतर्गत नाटिका सादर करून उल्लेखनीय यश संपादित केले. या नाट्यसंघात कु. नेहल मठकर, कु. सोहम सावंत,कु. विभव राऊळ,कु. श्रेयस रेडकर, कु.श्रेया मोर्ये,कु. रीया जेवरे, कु.उमेझा शेख, कु.चिन्मयी बागवे हे विद्यार्थी सहभागी झाले.

सदर नाटीकेचे लेखन व दिग्दर्शन प्रशालेचे सहशिक्षक श्री.गोविंद प्रभू यांनी केले. प्रशालेच्या या यशाबद्दल शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. या यशाबद्दल  सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीमंत राजेसाहेब  खेमसावंत भोंसले ,चेअरमन श्रीमंत राणीसाहेब शुभदादेवी खेमसावंत भोंसले,कार्यकारी विश्वस्त श्रीमंत लखमराजे भोंसले , विश्वस्त युवराज्ञी श्रद्धाराजे  भोंसले व मंडळाचे संचालक श्री दिलीप देसाई , मंडळाचे सहाय्यक संचालक ॲड.  शामराव सावंत, मंडळाचे सदस्य श्री जयप्रकाश सावंत ,डॉ.सतीश सावंत ,मुख्याध्यापिका श्रीमती अनुजा साळगावकर तसेच प्रशालेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी ,पालक शिक्षक संघ कार्यकारी समितीचे सदस्य यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.