
सावंतवाडी : गेल्या सहा महिन्यांपासून कारिवडे कालिका मंदिर जवळून दर १५ दिवसांनी गरीब रुग्णांना घेऊन धारगळ, गोवा येथील आयुष आयुर्वेदिक हॉस्पीटलमध्ये जाण्यासाठी विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटनेमार्फत मोफत गाड्यांची व्यवस्था केली आहे. याचा लाभ घेतलेले बहुसंख्य रुग्ण बरे झाले आहेत. रुग्णालयातील सर्व डॉक्टर व कर्मचारी चांगली सेवा देत आहे. त्याबाबत माजी शिक्षण व आरोग्य सभापती मंगेश तळवणेकर यांनी त्यांचे आभार मानले आहेत. तसेच यापुढेही त्यांनी गरीब रुग्णांना अशीच सेवा द्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.