
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा पतसंस्था फेडरेशन कमिटीवर अॅड. समीर वंजारी यांची बिनविरोध सदस्य म्हणून निवड झाली आहे. या निवडीबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज पतसंस्था फोंडाघाट संचालक मंडळाच्या वतीने अभिनंदनचा ठराव करून संचालक अॅड. समीर वंजारी यांचा सन्मान करत शुभेच्छा दिल्या. यावेळी अध्यक्ष गणपत वळंजु, उपाध्यक्ष गणेश कुशे, दिलीप पारकर, गणपत पारकर, सुनील कोरगावकर, सुनील दुबळे, उमेश वाळके, संजय पेडणेकर, विद्या माणगावकर, अनिता रेवडेकर, कार्यकारी अधिकारी ईश्वरदास पावसकर व त्यांचे सहाय्यक लिपिक उदय मोदी व इतर कर्मचारी वृंद उपस्थित होते.