
सावंतवाडी : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात प्रसूती विभागात असणाऱ्या पेशंटना फळे आणि बिस्किटांचे वाटप करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सावंतवाडी तालुकाध्यक्षा रिद्धी रोहन परब, जिल्हा महिला उपाध्यक्षा मानसी देसाई, महिला सदस्य जानकी नाईक, अनुराधा परब तसेच परिचारिका वर्ग उपस्थित होते.