
सावंतवाडी : दहशतवाद असाच संपवावा लागतो अशा आशयाचा बॅनर सावंतवाडीत पहायला मिळत आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हा बॅनर हिंदुत्ववादी संघटनांकडून लावला असल्याचं बोलल जातंय.
मोती तलाव शिव उद्यान शेजारी हा बॅनर लावण्यात आला असून ४०० वर्षापूर्वी आपल्या शंभूराजेंना धर्म बदलला नाही म्हणून मारले आणि आज ही २७ लोकांना धर्म विचारुनच मारले.काहीच बदलले नाही. म्हणून, तुम्ही किमान नाव विचारूनच खरेदी करा. १००% आर्थिक बहिष्कार असा बॅनर विश्व हिंदू परिषद, बजरंगदल, हिंदू जागरण मंच सकल हिंदू समाज, सिंधुदुर्ग यांच्याकडून लावण्यात आला आहे.