
सावंतवाडी : येथील कोकणचे पंढरपूर श्री विठ्ठल रखुमाई मंदीर सावंतवाडी येथे श्री. लक्ष्मण उर्फ संजय पांडूरंग ठाकुर, संकलीत पुस्तकाचे प्रकाशन समारंभ सोहळा गुरुवार दि. १ मे २०२५ दिवशी विठ्ठल रखुमाई मंदीर सावंतवाडी येथे "५:३० वाजता आयाजित केला आहे.
या पुस्तक प्रकाशान सोहळा दामोदर कृष्णाजी तथा दा.कृ. सोमण जेष्ठ खगोलशास्त्र-तज्ञ आणि पंचांग कर्ते ह्यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाला आमदार दिपक केसरकर माजी शालेय शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य, प्रदिप ढवळ उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, अधिवक्ता दिलीप नार्वेकर अध्यक्ष श्री विठ्ठल रखुमाई देवस्थान समिती सावंतवाडी ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. यानंतर सायंकाळी निखळ स्वरांची भक्तिमय मैफील सादर होणार आहे. झीटीव्ही सारेगमप लिटील चॅपम्स यशस्वी जोडी प्रथमेश लघाटे व मुग्धा लघाटे- गोडसे ही स्वरांची मैफिल सादर करणार आहेत.
या पुस्तकाचे संकलन सावंतवाडी शहराचे सुपुत्र लक्ष्मण उर्फ संजय पांडुरंग ठाकुर यानी केले आहे. यावर्षी या मंदीराची त्री (३०० वर्ष पूर्ण) शताब्दी वर्ष आहे व प. पु. भाऊ मसूरकर त्यांची जन्म शताब्दी वर्ष आहे. हे दोन्ही योग विलक्षण रित्या जुळून आले आहेत. ह्याचे औचित्य साधून या मंदीराचा इतिहास, मंदिरातील स्थापीत मूर्ती या विषयी माहीती व साधुसंतांची तोड ओळख पुस्तक रुपाने संकलित करण्यात आली आहे. लक्ष्मण उर्फ संजय पांडूरंग ठाकुर, उद्योगखाते महारष्ट्र राज्य या कार्यालयातून उपसंचालक म्हणून निव्वृत्त झाले आहेत. त्यांची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून माजी मंत्री दिपक केसरकर व विद्यमान उद्योग मंत्री उदय सामंत हयांच्या कडे काम पाहीले आहे. तरी या समारंभास उपस्थित रहावे अशी अग्त्याची विनंती शाताब्दी समिती सावंतवाडी यानी केले आहे.