न्हावेलीत जिल्हास्तरीय भजन स्पर्धेचं आयोजन

Edited by:
Published on: April 04, 2025 11:12 AM
views 47  views

सावंतवाडी : श्री देवी माऊली मंदिर न्हावेली येथे रामनवमीनिमित्त शनिवार ५ एप्रिल रोजी सायंकाळी ६.३० वाजता जिल्हास्तरीय भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रथम पारितोषिक ५,००१ रुपये प्रमाणपत्र व चषक द्वितीय ३,००१ रुपये प्रमाणपत्र व चषक तृतीय पारितोषिक २००१ प्रमाणपत्र व चषक,प्रथम उत्तेजनार्थ १५०१ रुपये प्रमाणपत्र व चषक,द्वितीय १००१ रुपये प्रमाणपत्र व चषक सहभागी संघ पुढीलप्रमाणे -सायंकाळी ६.३० वाजता श्री ब्राम्हण देव  प्रासादिक भजन मंडळ,पावशी कुडाळ ( बुवा - प्रियांका तवटे ) सायंकाळी ७.३० वाजता ब्राम्हण देव प्रासादिक भजन मंडळ,मळेवाड ( बुवा - प्रथमेश मोरजकर ) रात्री ८.३० वाजता श्री देवी सातेरी घोडेमुख प्रासादिक भजन मंडळ,मातोंड ( बुवा - विशाल घोगळे ) रात्री ९.३० वाजता श्री गणेश भजन मंडळ,माजगाव ( बुवा - कृणाल वारंग ) रात्री १०.३० वाजता वेताळ मुंजेश्वर प्रासादिक भजन मंडळ, पाईप मालवण ( बुवा - ओमकार येरम ) रात्री ११.३० वाजता जैन महालक्ष्मी प्रासादिक भजन मंडळ,वालावल कुडाळ ( बुवा - भूषण घाडी ) रात्री १२.३० वाजता श्री कोळंबा देव प्रासादिक भजन मंडळ,नांदगाव  कणकवली ( बुवा - राकेश तेली ) रात्री १.३० वाजता चिंतामणी प्रासादिक भजन मंडळ,सुरंगपाणी वेंगुर्ला ( बुवा - अनिकेत भगत ) रात्री २.३० वाजता श्री देव सिद्धेश्वर भजन मंडळ,कोंडुरा वेंगुर्ला ( बुवा - विवेक पेडणेकर ) हे संघ सहभागी होणार आहेत. लाभ घेण्याचे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.