नितेश राणेंनी घेतली मंत्रीपदाची शपथ

सावंतवाडीत जल्लोष
Edited by:
Published on: December 15, 2024 18:45 PM
views 572  views

सावंतवाडी : भाजपचे आमदार नितेश राणे यांनी मंत्रीपदाची शपथ घेताच सावंतवाडीत भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी जल्लोष केला. फटाक्यांची आतषबाजी करत जोरदार घोषणाबाजी यावेळी करण्यात आली. भाजप पक्ष कार्यालयाकडे हा जल्लोष करण्यात आला. 

तळकोकणातील भाजपचे एकमेव आमदार नितेश राणे यांनी मंत्रीपदाची शपथ घेताच सावंतवाडी भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. फटाके फोडून जोरदार घोषणाबाजी यावेळी करण्यात आली. भाजपचे आमदार नितेश राणे मंत्री झाले हा आमच्यासाठी आनंदाचा क्षण आहे असे प्रतिपादन शहराध्यक्ष अजय गोंदावळे यांनी व्यक्त केले. यावेळी माजी नगरसेवक उदय नाईक, आनंद नेवगी, गुरू मठकर, श्री. मठकर, ओंकार सावंत, श्री. जामदार यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.