
सावंतवाडी : सालईवाडा येथील मच्छी मार्केट परिसरातील वळणावर पाण्याचा पाईपलाईनच्या कामासाठी खोदण्यात आलेला खड्डा अद्याप पर्यंत बुजवण्यात आला नसल्याने त्यात मालवाहू टेप्मोच चाक रूतून मोठं नुकसान झाले आहे. ही घटना आज सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली.
हा खड्डा का बुजवला गेला नाही ? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. नगरपालिकेच्या या कामाबाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. यात अपघात झालेल्या वाहनाचे देखील मोठे नुकसान झाले आहे. तर नगरपालिका नळासाठी खड्डा खणला आहे. तो तसाच ठेवल्याने गाडी यात रूतली. याबाबत नुकसान कोण देणार विचारले असता ? लिकेज मिळत नाही अस उत्तर पालिकेकडून देण्यात आल्याचे सांगत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे शहरप्रमुख शैलैश गवंडळकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.