शिवसेना महीला आघाडीकडून सावंतवाडी तहसीलदारांचा सन्मान...!

Edited by: विनायक गावस
Published on: August 02, 2023 19:41 PM
views 93  views

सावंतवाडी : शिवसेना महीला आघाडी तर्फे सावंतवाडी तहसिलदार कार्यालयात तहसिलदार श्रीधर पाटील यांची भेट घेतली. त्यांनी सावंतवाडी तालुक्यात मागील महीन्यात झालेल्या अतिवृष्टीत शासनामार्फत आपत्कालीन व्यवस्थापन उत्तम  व  योग्य प्रकारे बजावलं त्याकरिता   शिवसेना महीला आघाडी तर्फे त्यांचा शाल श्रीफळ देवुन गौरव व अभिनंदन करण्यात आले. असेच चांगले कार्य त्यांच्याकडून व्हावे  अशी सदिच्छा शिवसेना महीला आघाडीच्या जिल्हासंघटक अँड निता सावंत कविटकर यांनी व्यक्त  केली.

यावेळी उपजिल्हासंघटक सौ अर्चना पांगम, सौ उर्त्कषा  गावकर, उपशहर प्रमुख सौ नीलिमा चलवाडी , शाखासंघटक सिमा सोनटक्के, प्रभाग संघटक  सौ पूजा नाईक, बुथ संघटक  सौ भारती परब, तसेच निरवडे शाखासंघटक सौ. चैञाली गावडे व उर्मीला उरणकर,  साधना मोरे,कांचन जाधव,अनीता शिंदे या सर्व महीला पदाधिकाऱी  उपस्थित  होते.