सावंतवाडी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरचिटणीस पदी हिदायतुल्ला खान

Edited by: विनायक गावस
Published on: July 12, 2023 11:31 AM
views 126  views

सावंतवाडी : सावंतवाडी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरचिटणीस पदी हिदायतुल्ला खान यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे नियुक्तीपत्र त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे विरोधीपक्षनेते डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते देण्यात आले. हिदायतुल्ला खान गेली काही वर्षे उद्योग व व्यापार सेलच्या माध्यमातून पक्षात कार्यरत होते. त्यांच्यावर आता सरचिटणीस पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.  राष्ट्रवादी पक्षाची ध्येय धोरणे समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी काम करणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. याप्रसंगी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब, अमित सामंत, व्हिक्टर डांन्टस, शेखर माने, पुंडलिक दळवी आदी उपस्थित होते